Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आजही थंडी (Cold) चा कडाका कायम आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. त्यामुळे हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा अधिकच घसरला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील थंडी कायम आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.
राज्यामध्ये काही ठिकाणी सातत्याने थंडीचा कडाका वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वातावरणाचा थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्यासह उत्तर भारतात देखील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर बर्फाची चादर पसरलेली दिसत आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहे. तर उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पाणी गोठलं आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींच्या सामना करावा लागत आहे.
वाढत्या थंडीचा शेतकऱ्यांच्या पिकांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. राज्यातील कापूस, हरभरा, तूर तसेच केळी या पिकांवर वाढत्या थंडीमुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 21 ते 25 जानेवारी दरम्यान सक्रिय वेस्टर्न डिस्टबर्न्सचा वायव्य भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. 21 जानेवारीला पहाटे पश्चिम हिमालय भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर, 25 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Brijbhushan Singh | बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ; महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाचे आरोप
- Congress | “…त्याला आपण देहविक्री म्हणतो, मग स्वत:ला विकणाऱ्या आमदारांना…”; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्यावरुन वाद
- Shivsena | “याचा अर्थ सगळे भाजप धुतल्या तांदळासारखे”; सेनेने जाहीर केली ईडीची चौकशी झालेल्या नेत्यांची नावे
- Nana Patole | “भाजपासारख्या हुकूमशाही व्यवस्थेला संपवण्यासाठी…”; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
- Congress | कोल्हापूरात काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिली पक्षाला सोडचिठ्ठी