Abdul Sattar | मुंबई: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव नेहमी वेगवेगळे घोटाळ्यांमध्ये जोडले जाते. एका खत कंपनीत कृषी विभागाच्या कथित पथकाने टाकलेल्या धाडेत अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहायक दीपक गवळी यांचं नाव आलं होत. दीपक गवळी हा माझा स्वीय सहायक नाही, अशी प्रतिक्रिया सत्तरांनी दिली होती. मात्र, एका शासकीय दौऱ्यामध्ये त्यांनी दीपक गवळीचा स्वीय सहाय्यक म्हणून उल्लेख केला होता.
150 crores scam in Agriculture Industry Development Corporation
कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप दैनिक सामनातून करण्यात आला आहे. त्याचबरोबर कीटकनाशकच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सामनाच्या माध्यमातून अब्दुल सत्तारांवर करण्यात आला आहे. निविदेतील अटी शर्ती भरणास गुंडाळून सत्तार (Abdul Sattar) यांच्या मर्जीतील कंपनीच्या घशात हे कंत्रात घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे.
याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, “राज्यातील कृषी विभाग (Abdul Sattar) भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला आहे. शेतकऱ्यांना न्याय देणार हे खातं आज फक्त भ्रष्टाचार करताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या या भ्रष्टाचाराला गृह खात्याचा पाठिंबा आहे का?”
दरम्यान, घोटाळा प्रकरणावरून अब्दुल सत्तार नेहमी वादात सापडताना दिसत आहे. अब्दुल सत्तार आणि भ्रष्टाचार मालिका संपत नसल्याचं यातून स्पष्ट होत आहे. अब्दुल सत्तार घोटाळा प्रकरणांमध्ये सापडत असताना दैनिक सामनातून त्यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Gaikwad | बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपची महाराष्ट्रात काय औकात होती? शिंदेगट -भाजप मध्ये वाद वाढला
- Sunil Raut | ती एक कीड होती, जी निघून गेली; सुवर्णा कारंजे यांच्या पक्षांतरावर सुनील राऊतांची प्रतिक्रिया
- Supriya Sule | चालू लोकलमध्ये महिला डब्यात तरुणीवर बलात्कार, सुप्रिया सुळे यांची संतापजनक प्रतिक्रिया
- Sanjay Raut | संजय राऊतांचा धमकीचा बनाव? आरोपी सुनिल राऊत यांचा कट्टर कार्यकर्ता
- Vande Bharat Express | पावसामुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पाणीच पाणी! पाहा VIDEO