Eknath Shinde | ‘फेविकॉल का जोड है तुटेगा नही’ एकनाथ शिंदे, तर फडणवीस म्हणतात ‘इतकं तकलादू सरकार आमचं नाही’

Eknath Shinde | पालघर: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोघेही आज पालघर येथे एका कार्यक्रमाला एकत्र हेलिकॉप्टरने गेले होते. कुणी कितीही प्रयत्न केला तरी आमची मैत्री तुटणार नाही, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Yeh fevicol ka jod hai tutega nahi – Eknath Shinde

यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “देवेंद्रजींची आणि माझी मैत्री काही आत्ताची नाही. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून आमची ही मैत्री आहे. आम्ही दोघेही आमदार होतो, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. जिवा-भावाची आमची ही मैत्री आहे. ये फेविकॉल का जोड है तुटेगा नही.”

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “काही लोक म्हणता आमची जय-वीरूची जोडी आहे. पण मी एकच सांगतो, ही जोडी युतीची आहे. ही जोडी खुर्चीसाठी बनलेली नाही. त्याचबरोबर आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाहीत. जे लोक स्वार्थासाठी एकत्र आलेले होते त्यांना जनतेनेच बाजूला करून टाकलेलं आहे.”

या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या आणि मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या मैत्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीपेक्षा जास्त मजबूत आमचं सरकार आहे. कोणत्याही जाहिरातीमुळे आमच्यात वाद होईल इतकं तकलादू सरकार आमचं नाही.” “मागचं सरकार म्हणजे आपल्या घरी आणि आत्ताच सरकार म्हणजे आपल्या दारी. हा महत्त्वाचा फरक दोन्ही सरकारमध्ये आहे. आधीच सरकार घरी बसून होतं. मात्र, आताचं सरकार तुमच्या दरी येऊन तुम्हाला तुमचे अधिकार मिळवून देईल”, असही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटातील पाच मंत्र्यांची हकलपट्टी भाजप करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बॅनरवॉर झाल्याचं दिसून आलं आहे. या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही प्रतिक्रिया आली आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या