Asia Cup | आशिया कपचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ ठिकाणी होणार सामने

Asia Cup | टीम महाराष्ट्र देशा: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) संपल्यानंतर क्रिकेट चाहते आशिया कप (Asia Cup) सामन्यांची वाट बघत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपलेली असून आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. 31 ऑगस्ट 17 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेतील सामने होणार आहे.

The first four matches of the Asia Cup will be played in Pakistan

आशिया चषक स्पर्धेतील (Asia Cup) पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहे. तर त्यानंतरचे नऊ सामने श्रीलंकेमध्ये खेळले जाणार आहे. या स्पर्धेतील सेमीफायनल आणि फायनल श्रीलंकेमध्ये खेळला जाणार आहे.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे सहा संघ आशिया चषक स्पर्धेसाठी (Asia Cup) मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेमध्ये तब्बल 13 सामने खेळले जाणार आहेत. हे सामने दोन ग्रुपमध्ये खेळण्यात येणार आहे. यामध्ये एका ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ सामील आहेत.

आशिया चषक स्पर्धा 2023 (Asia Cup) हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळली जाणार असल्याची माहिती एसएससीने दिली आहे. या स्पर्धेमध्ये दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर-4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर या संघांमध्ये एकूण सहा सामने खेळवले जातील. या सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचतील.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.