Shreyas Iyer | IPL सुरू असताना श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या

Shreyas Iyer | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) हंगाम सुरू आहे. आयपीएल सामने सुरू असताना टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलमध्ये खेळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया करण्यात आली (Shreyas Iyer underwent surgery)

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) गेल्या अनेक काळापासून पाठीच्या दुखापतीला झुंज देत होता. मीडिया रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यरवर लंडनमध्ये मंगळवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे श्रेयसला जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून बाहेर पडावे लागले आहे. तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आयपीएल 2023 पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका पार पडली होती. हा कसोटी सामना सुरू असताना अय्यरने (Shreyas Iyer) पाठीच्या खालच्या भागात सूज आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी येऊ शकला नव्हता. त्याचबरोबर या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएल 2023 खेळता आली नाही.

दरम्यान, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने भारतीय संघासाठी आतापर्यंत 42 एकदिवसीय, 10 कसोटी आणि 49 टी-20 सामने खेळले आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 1631, कसोटी सामन्यांमध्ये 666 आणि टी-20 सामन्यांमध्ये 1043 धावा केल्या आहे. भारतीय संघासाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.