Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये तरुणीचा छळ करणाऱ्या नराधमानं केलं आणखी पाच महिलांसोबत गैरवर्तन

Mumbai Local | मुंबई: मुंबई लोकलमध्ये महिला डब्यात एका तरुणीचा छळ झाल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याबाबत ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं होतं. हा वाद सुरू असताना या घटनेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

A man named Nawazu Karim Shaikh abused women

मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) ज्या तरुणीचा छळ करण्यात आला होता, त्या नराधमाने आणखी पाच महिलांसोबत गैरवर्तन केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या या आरोपीचं नाव नवाझू करीम शेख आहे. प्रेस फ्री जर्नलनं या संदर्भात माहिती दिली आहे.

सीएसएमटीवरून निघालेल्या एका लोकल ट्रेनच्या (Mumbai Local) लेडीज डब्यात नवाझू करीम शेख चढला होता. डब्यात तरुणी एकटी असल्याचे पाहून त्याने तिचा छळ केला. त्यानंतर तरुणीने लगेच या आरोपीबद्दल तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेत त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असताना सीएसएमटी स्थानकावरील (Mumbai Local) सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये हा नराधम आणखीन पाच महिलांसोबत गैरवर्तन करताना दिसून आला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे तो गैरवर्तन करताना दिसत असताना आसपासच्या कोणत्याही प्रवाशानं त्याला थांबवलं नाही, असं फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या