Crime | धक्कादायक! वर्षभरापूर्वी झालेल्या वादामुळे मित्रांनीच केली मित्राची हत्या

Crime | बल्लारपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी जुन्या वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. जुन्या वादातून मित्रांनी धारदार शस्त्र आणि दगडफेक करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपींनी पोलीस ठाण्यात गुन्हा कबूल केला आहे. Deepak was killed due to an … Read more

Published On: 

Crime | बल्लारपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी जुन्या वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. जुन्या वादातून मित्रांनी धारदार शस्त्र आणि दगडफेक करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपींनी पोलीस ठाण्यात गुन्हा कबूल केला आहे.

Deepak was killed due to an old dispute

दीपक कैथवास या तरुणाची हत्या (Crime) अर्जुन कैथवास, गौरव लिडबे, प्रथम पाटील आणि दुखशैर कैथवास यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश ठाकूर हे उमेश पाटील यांच्या निरीक्षणात आणि उपविभागीय अधिकारी साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. एका जुन्या वादामुळे या आरोपींनी दीपकची हत्या केली आहे.

केजीएन शाळेजवळ मध्यरात्री साधारण दोन वाजता दीपक एकटाच असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. ही संधी साधून चौघांनी दीपकवर हल्ला (Crime) केला. हे प्रकरण झाल्यानंतर आरोपींनी पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा कबूल केला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाची (Crime) सखोल चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षण शैलेश ठाकरे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही