Share

आनंदाच्या शिध्यात देणार महागडी व्हिस्की अन् बिअर; राऊत यांनी दिले आश्वासन

Vanita Raut Lok Sabha Election : देशात लोकसभेच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. राजकीय पक्षातील उमेदवार नेत्यांकडून-मोठं मोठे आश्वासन आणि आमिष दाखवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

असेच एक आश्वासन सद्या देशभरात चर्चिले जात आहे, ते म्हणजे आनंदाच्या शिध्यात महागडी व्हिस्की अन् बिअर देणार असल्याचे विधान अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी केले आहे.

वनिता राऊत म्हणाल्या की, ”फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की-बिअर का प्यावी?  देशी पिणाऱ्या गरिबांना देखील कधी कधी चांगली दारू मिळावी यासाठी आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन राऊत यांनी केले आहे.

2019 मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत देखील राऊत यांनी ‘गाव तिथे दारूचं दुकान’ असे आश्वासन दिले होते. इतर जिल्ह्यात दारू बंदी नाही. मग चंद्रपुरकरांनी नेमके काय वाईट केले आहे की, त्यांना दारूबंदी सारखे निर्बंध घालण्यात येत आहे. चंद्रपुरमध्ये दारूबंदी उठवली गेली तर अनेकांना रोजगार मिळेल. असा दावा राऊत यांनी यांनी केला होता.

Vanita Raut Promise To Served Expensive Whiskey And Beer On Ration Card

श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनी देखील महागडी व्हिस्की-बिअर मिळायला हवी. या हेतून त्यांना आनंदाच्या शिध्यात अतिशय अल्प दरात व्हिस्की-बिअर देण्याचे आश्वासन वनिता राऊतांनी मतदारांना दिलंय. त्यामुळे त्यांच्या या आश्वासनाला चंद्रपुर मतदारसंघातील मतदार कितपत साथ देतात हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Vanita Raut Lok Sabha Election : देशात लोकसभेच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. राजकीय पक्षातील उमेदवार नेत्यांकडून-मोठं मोठे आश्वासन आणि आमिष …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now