Share

बाबर आझम पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार; नाराजी नाट्य थांबले

🕒 1 min read Babar Azam लाहोर : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला अवघे दोन महिने बाकी असताना पाकिस्तानने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी पुन्हा एकदा बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवले आहे. शाहीन आफ्रिदीला केवळ एका मालिकेनंतर ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. निवड समितीनेच कर्णधारपदासाठी बाबरचे नाव सुचविले. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) एकमताने बाबरच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. एकदिवसीय … Read more

Published On: 

🕒 1 min read

Babar Azam लाहोर : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला अवघे दोन महिने बाकी असताना पाकिस्तानने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी पुन्हा एकदा बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवले आहे. शाहीन आफ्रिदीला केवळ एका मालिकेनंतर ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे.

निवड समितीनेच कर्णधारपदासाठी बाबरचे नाव सुचविले. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) एकमताने बाबरच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघांचे बाबर नेतृत्व करेल, असे ‘पीसीबी’चे अध्यक्ष मोहसीन यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातील अपयशानंतर बाबरने पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले होते. मोहसीन यांची ‘पीसीबी’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून कर्णधारपदासाठी बाबरचे नाव पुन्हा चर्चेत आले.

मात्र, कर्णधारपदाचा कालावधी निश्चित असावा आणि कसोटी संघाचे नेतृत्वही माझ्याकडेच सोपवण्यात यावे अशी अट बाबरने घातली होती. परंतु, सध्या केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी निर्णय घेण्यात आल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले आहे.

कसोटीसंदर्भातील निर्णय पुढील मालिकेच्या वेळेस घेता येईल, असे सांगून त्यांनी बाबरची समजूत काढल्याचे समजते. सध्या शान मसूद कसोटी संघाचा कर्णधार आहे.

बाबर आझम पाकिस्तानचा नवा कर्णधार असेल. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतून तो संघाची धुरा सांभाळणार आहे. यापूर्वी पीसीबीने कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्यानंतरही बाबर आझम हे स्वीकारण्यास राजी नसताना पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुरू असलेले नाट्य आता थांबणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही