५ लाख ८० हजार पवार विरोधी मतदारांनी आता करायचे काय? Vijay Shivtare संधीसाधू, लेचापेचा, पलटूराम निघाला

विजय शिवतारे, बारामती लोकसभा निवडणुक, Vijay Shivtare, Ajit Pawar, lok sabha election 2024, Marathi news

Vijay Shivtare पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटत बारामतीमधून निवडणूक लढविण्याची घोषणा करून माघार घेणाऱ्या पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्याविरोधात टीका सुरू झाली आहे.

शिवसेना नेते विजय शिवतारे यांना शिवसैनिकांनी चांगलेच धारेवर धरले आहे. कार्यकर्त्यांनी पत्र लिहीत शिवतारेंना संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात असणारा नेता म्हंटले आहे.

तर सोशल मिडीयात ‘महाराष्ट्राचा पलटूराम’ म्हणून ‘हॅशटॅग’ फिरवला जात आहे. ‘पुरंदरचा मांडवली सम्राट’,’पाकीट भेटलं का?’, ‘घुमजाव’, ‘शिवतारे जमी पर’, ‘चिऊतारे’, ‘शेवटी, आपला आवाका दाखविला’, ‘५० खोके शिवतारे ओके’, अशा कंमेंट सोशल मिडीयात लिहिल्या जात आहे.

शिवतारे यांच्यावर टीका करतानाच पवार विरोधी ५ लाख ८० हजार मतदारांनी आता नेमके करायचे काय?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आमचा नेता पलटूराम निघाला, असा आरोपही होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बारामती कोणाचा सातबारा नाही, असे सांगत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते.

माझ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास नको, म्हणून माघार घेत असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. अजित पवार यांच्यासारखा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला.

या पापाचे परिमार्जन मतदारांनाच करावे लागणार आहे. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे, अशी टीका केली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचा साक्षात्कार झाला आहे का, तुम्ही रामायणातले बिभीषण आहात की नाही, याचे उत्तर द्या असे नमूद करण्यात आले आहे.

पुरंदरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

शिवतारे यांच्यासाठी पुरंदर विधानसभा मतदारसंघ जाण्याची शक्यता असल्याने पुरंदरमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना निधीसाठी देखील कात्री लावली होती. भाजप कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक देत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे, असे भाजपचे गणेश जगताप यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.