बनावट कागदपत्रांद्वारे बँकेकडून १८ लाखांचे वाहन कर्ज

Car loan पुणे : महागडी मोटार खरेदीसाठी बँकेकडे बनावट कागदपत्रांद्वारे १८ लाखांचे कर्ज प्रकरण सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चैतन्य श्रीकांत नाईक विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चैतन्य श्रीकांत नाईक (रा. तुकाईनगर, वडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपाली बाळकृष्ण आठल्ये (वय ४३, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

Published On: 

Car loan पुणे : महागडी मोटार खरेदीसाठी बँकेकडे बनावट कागदपत्रांद्वारे १८ लाखांचे कर्ज प्रकरण सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चैतन्य श्रीकांत नाईक विरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी चैतन्य श्रीकांत नाईक (रा. तुकाईनगर, वडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपाली बाळकृष्ण आठल्ये (वय ४३, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नाईकने महागडी मोटार खरेदीसाठी एका वाहन विक्री दालनाच्या नावे सिंहगड रस्त्यावरील विद्या सहकारी बँके शाखेत कर्जप्रकरण सादर केले होते. नाईकने बँकेकडून १८ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज मागितले होते. बँकेने त्याला वाहन कर्जापोटी १८ लाख रुपये मंजूर केले.

त्यानंतर त्याने कल्याणीनगर येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत बनावट नावाने खाते उघडून मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम जमा केली. बँकेला स्काय मोटो अॅटोमोबाइलच्या नावे बनावट पावती दिली.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही