जिल्हाधिकाऱ्यांचा दीपक केसरकरांना दणका; गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यक्तींना पिस्तूल जमा करण्याचे आदेश

Collector order to deposit pistol to Deepak Kesarkar

Deepak Kesarkar सावंतवाडी : निवडणूक काळात परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील सुमारे अडीचशे परवानाधारकांपैकी केवळ तेरा जणांना याबाबत नोटीसा देण्यात आल्या असून यात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचेही नाव आहे.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी काढलेल्या आदेशानुसार, जामिनावर मुक्तता झालेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि कोणत्याही वेळी, खास करून निवडणूक कालावधीमध्ये दंगलीत समावेश असलेल्या व्यक्तींना शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

तालुक्यातील १३ जणांची यादीमध्ये नावे असून सर्वांत शेवटचे नाव दीपक केसरकर यांचे आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी शंका उपस्थित झाली आहे. एखाद्या दंगलीत समावेश होता, की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, की एखाद्या प्रकरणात जामीनावर मुक्तता झाल्यामुळे त्यांचे नाव यादीत आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

Collector order to deposit pistol to Deepak Kesarkar

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.