T20 World Cup 2024 | विश्वचषकासाठी संघनिवड एप्रिल अखेरीस? रोहित शर्मा बाबत महत्वाची अपडेट

Rohit Sharma T20 World Cup 2024

T20 World Cup 2024 | अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या T20i विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची निवड एप्रिल महिन्याच्या अखेरीस केली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेकरिता संघ पाठवण्यासाठी १ मे ही अंतिम मुदत असून, त्यानंतर संघांना २५ मेपर्यंत आपल्या संघात बदल करता येणार आहे.

T20 World Cup 2024 साठी १५ सदस्यीय संघ निवडताना ‘आयपीएल’मधील कामगिरी लक्षात घेतली जाणार हे निश्चित आहे. त्यामुळेच IPL 2024 चा पहिला टप्पा पार पडल्यानंतर निवड समिती भारतीय संघ निवडू शकते. स्पर्धेसाठी भारताचे १० खेळाडू निश्चित आहेत. अन्य पाच स्थानांसाठी स्पर्धा आहे.

यंदाची स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये असल्यामुळे निवड समिती काही राखीव खेळाडूंची निवड करणार आहे. विश्वचषकासाठी संघ निवडायचा असल्यामुळे निवड समितीचे चार सदस्य IPL 2024 मधील सामन्यांना उपस्थिती लावत आहेत.

‘‘आयपीएलची साखळी फेरी १९ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेचच भारतीय संघाची पहिली तुकडी न्यूयॉर्कसाठी रवाना होईल. भारतीय संघात निवड झालेल्या ज्या खेळाडूंचे ‘आयपीएल’ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील, त्यांना नंतर अमेरिकेत पाठवले जाईल,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले. IPL 2024 अंतिम सामना २६ मे रोजी खेळवला जाणार असून T20i विश्वचषकाला २ जूनपासून सुरुवात होणार आहे.

रोहित शर्मा T20 World Cup 2024 मध्ये भारताचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट असून रोहितच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा भारतीयांना आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.