संधीसाधू, लेचापेचा, पलटूराम पत्रानंतर, बापू तुम्ही असं का केलं? कवितेतून Vijay Shivtare यांना जाब विचारला

Vijay Shivtare, लोकसभा निवडणूक २०२४, अजित पवार, विजय शिवतारे

Vijay Shivtare । लोकसभा निवडणूका जश्या-जश्या जवळ येत आहेत तसे राजकीय नेते कुलांट्या उड्या मारताना आपल्याला दिसत आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांना टोकाचा विरोध केला होता, गरज पडली तर शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देईल पण पवारांना निवडून येऊ देणार नाही असे शिवतारे म्हणाले होते.

अजित पवारांचा माज गेलेला नाही, अजित पवार नीच, उर्मट म्हणत खालच्या भाषेत शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि शिवतारे यांची मुंबईत बैठक झाली, त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांनी शिवतारेंना त्यांचा आवाका दाखवला असल्याची चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, शिवसैनिकांनी विजय शिवतारे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. कार्यकर्त्यांनी पत्र लिहीत शिवतारेंना संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात असणारा नेता म्हंटले आहे.

तसेच माझा नेता पलटूराम निघाला, आता पाच लाख पवार विरोधी मतांनी काय करायचं? असा सवाल करत शिवतारेंना कार्यकर्त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र व्हायरल झालं आहे.

तर सोशल मिडीयात ‘महाराष्ट्राचा पलटूराम’ म्हणून ‘हॅशटॅग’ फिरवला जात आहे. ‘पुरंदरचा मांडवली सम्राट’,’पाकीट भेटलं का?’, ‘घुमजाव’, ‘शिवतारे जमी पर’, ‘चिऊतारे’, ‘शेवटी, आपला आवाका दाखविला’, ‘५० खोके शिवतारे ओके’, अशा कंमेंट सोशल मिडीयात लिहिल्या जात आहे.

पत्रानंतर आता पांगारे येथील युवकाने शिवतारेंना जाब विचारत कविता लिहिली आहे. बापू तुम्ही असं का केलं ? असे या कवितेला शीर्षक देण्यात आले आहे.

बापू तुम्ही असं का केलं ?

पन्नास वर्ष संसदेत गेलं
महाराष्ट्राचं फक्त वाटोळं केलं
भल्या भल्यांना धाडस नाही झालं
तुम्ही मात्र उभं आडवं फाडलं
पण मग आज…
बापू तुम्ही असं का केलं ?

गुंजवणीचं पाणी बारामतीला गेलं
पुरंदर करपला, बारामतीचं हटंना ओलं
बसलात उपोषणाला स्वतःच्या किडणीचं मातेरं केलं
पुरंदरला हक्काचं पाणी मिळालं
पण मग आज..
बापू तुम्ही असं का केलं ?

यूट्यूबवर तुमचं म्हणणं ऐकलं
तमाम मराठ्यांना त्यांनी संपवलं
कारखाने आजारी पाडून सहकार गिळलं..
खरं होतं तुमचं, आम्हाला मनापासून पटलं
पण मग आज…
बापू तुम्ही असं का केलं ?

अरेरावी करण्यात आयुष्य गेलं
महाराष्ट्राला वाडवडलांची जहागीर समजलं
कामशेतला शेतकऱ्यांना गोळ्या घालून मारलं.
उरलंसुरलं धरणात पण मुतलं
छातीठोकपणे तुम्हीच त्यांना खडसावलं
पण मग आज..
बापू तुम्ही असं का केलं ?

आमदारकीच्या बदल्यात ईथल्यांनीच तालुक्याला विकलं
डोळे मिटून त्यांच्या निर्णयाला डोकं हलवलं
पाणी गेलं, विमानतळ गेलं, मार्केट गेलं,
फ्लेक्सने फक्त सारं रस्तं भरलं
दोस्ताच्या मदतीने तुम्ही सगळं परत आणलं
पण मग आज..
बापू तुम्ही असं का केलं ?

अजूनही असं वाटतंय काहीतरी चुकलंय
तुम्हाला दडपणाखाली हा निर्णय घ्यायला लावलंय
मराठा युद्धात जिकतो आणि तहात हरतो..
आताही अगदी असंच झालंय
माझ्यासारख्या अनेकांचं मन गोंधळलंय…

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी यांना मत द्यायला सांगितलंय..
देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मी भ्रष्टाचाऱ्यांना मत द्यायचं ठरवलंय..

बापू, …… तुम्ही काय ठरंवलंय ?

संदीप एकनाथ काकडे
भाऊ वाडा
पांगारे ता. पुरंदर जिल्हा पुणे

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.