Indurikar Maharaj | टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांना त्यांचं वक्तव्य महाग पडलं आहे.
सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर महाराज यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळं आता इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
A complaint was filed against Indorikar Maharaj
इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) एका कीर्तनात लिंगभेदावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती.
संगमनेर प्रथम वर्ग कोर्टानं त्यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने प्रथमवर्ग न्यायाधीशांचा निकाल कायम ठेवला होता.
या खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदुरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं इंदुरीकर महाराजांच्या या याचिकेवर निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयानं खंडपीठानं घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. यानंतर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, शिर्डी जिल्ह्यातील ओझर येथे कीर्तन करत असताना इंदुरीकर (Indurikar Maharaj) महाराजांनी मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
ते म्हणाले, “सम तारखेला शरीर संबंध झाल्यास मुलगा आणि विषम तारखेला संबंध झाल्यास मुलगी होती. पण जर या तिथी हुकल्या तर मुलं बेवडी आणि खानदानाचं नाव मातीत मिसळणारी होतात.”
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | “हे नैतिक अधिकार तुम्हाला…”; आशिष शेलारांच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
- Omicron | नागरिकांनो काळजी घ्या! पुण्यात आढळला ओमीक्रोनचा नवा व्हेरिएंट
- Best Bus Strike | अखेर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे
- Sanjay Raut | “… तर मी खासदारकी सोडेल”; संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा एकदा उतरले मैदानात; ठाकरे गटावर केला 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप