🕒 1 min read
मुंबई, ता. १६: महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर मार्गी लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीमध्ये निवडणुका न झाल्याने राज्य सरकारला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाब विचारण्यात आला.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणुकांमध्ये झालेल्या विलंबाबद्दल राज्य सरकारला स्पष्टीकरण मागितले. यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने निवडणुका पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली. त्यामुळे आता या तारखेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व निवडणुका घेऊन त्यांचे निकाल जाहीर करणे बंधनकारक असणार आहे.
Maharashtra Local Body Elections by January 2026
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आहे. त्यामुळे या संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. निवडणुका कधी होणार याकडे सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय पक्ष डोळे लावून बसले होते. मराठा आरक्षणासह इतर काही कायदेशीर बाबींमुळे निवडणुका लांबणीवर पडल्याचे सांगितले जात होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या आदेशामुळे आता स्थानिक पातळीवरील राजकारण पुन्हा एकदा गतिमान होण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करणे हे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगासाठी एक मोठे आव्हान असणार आहे. या निर्णयामुळे मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या महापालिकांसह अनेक जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतींना लवकरच नवे लोकप्रतिनिधी मिळणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘हैदराबाद गॅझेट चुकीचा असेल तर शरद पवारांचा १९९४ चा जीआरही रद्द होणार’
- भारत-पाक सामन्यापूर्वी शाहीद अफ्रिदीचे वादग्रस्त विधान, म्हणाला, ‘यांना स्वतःला भारतीय सिद्ध करायचे आहे!’
- भारत-पाकिस्तान सामन्याआधीच मोठा धक्का; Washington Sundar ने टीम इंडियाची साथ सोडली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











