🕒 1 min read
दुबई, ता. १२: आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar ) अचानक टीम इंडियाची साथ सोडून इंग्लंडला रवाना झाला आहे. स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून संधी मिळालेला सुंदर आता थेट इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
आशिया कप स्पर्धेमध्ये वॉशिंग्टन सुंदरला भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळाले होते. मात्र, त्याला अंतिम ११ खेळाडूंच्या संघात (प्लेइंग इलेव्हन) संधी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे, त्याने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्याला इंग्लंडमधील हॅम्पशायर क्रिकेट क्लबने खेळण्याची ऑफर दिली, जी त्याने स्वीकारली आहे.
Washington Sundar Quits Team India for County Cricket
हॅम्पशायरने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (पूर्वीचे ट्विटर) याबाबतची माहिती दिली. “आम्हाला वॉशिंग्टन सुंदर संघात सामील झाल्याचा आनंद आहे. त्याचे स्वागत आहे! भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आता रोझ आणि क्राउन विरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी हॅम्पशायरकडून खेळेल,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अलीकडेच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर वॉशिंग्टन सुंदरने दमदार कामगिरी केली होती. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली होती. फलंदाजीत त्याने २८४ धावा केल्या होत्या, ज्यात त्याचे सरासरी ४७ होती. विशेषतः ओल्ड ट्रॅफर्ड येथे त्याने शानदार शतकही झळकावले होते. गोलंदाजीतही त्याने ३८.५७ च्या सरासरीने ७ विकेट्स घेतल्या होत्या.
वॉशिंग्टन सुंदरचा हा निर्णय भविष्यातील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आपली तयारी अधिक मजबूत करण्यासाठी असल्याचे मानले जात आहे. कारण, त्याला भारतीय संघात लगेच संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्याने प्रत्यक्ष मॅच प्रॅक्टिसला प्राधान्य दिले आहे.
🏏 आशिया कप 2025 वेळापत्रक
ग्रुप स्टेज
| तारीख | दिवस | सामना |
|---|---|---|
| 9 सप्टेंबर | मंगळवार | अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग |
| 10 सप्टेंबर | बुधवार | भारत विरुद्ध युएई |
| 11 सप्टेंबर | गुरुवार | बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग |
| 12 सप्टेंबर | शुक्रवार | पाकिस्तान विरुद्ध ओमान |
| 13 सप्टेंबर | शनिवार | बांगलादेश विरुद्ध श्रीलंका |
| 14 सप्टेंबर | रविवार | भारत विरुद्ध पाकिस्तान |
| 15 सप्टेंबर | सोमवार | श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग |
| 16 सप्टेंबर | मंगळवार | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान |
| 17 सप्टेंबर | बुधवार | पाकिस्तान विरुद्ध युएई |
| 18 सप्टेंबर | गुरुवार | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान |
| 19 सप्टेंबर | शुक्रवार | भारत विरुद्ध ओमान |
सुपर 4
| तारीख | दिवस | सामना |
|---|---|---|
| 20 सप्टेंबर | शनिवार | ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2 |
| 21 सप्टेंबर | रविवार | ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 2 |
| 23 सप्टेंबर | मंगळवार | ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2 |
| 24 सप्टेंबर | बुधवार | ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 2 |
| 25 सप्टेंबर | गुरुवार | ग्रुप ए क्वालिफायर 2 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2 |
| 26 सप्टेंबर | शुक्रवार | ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 1 |
अंतिम सामना
| तारीख | दिवस | सामना |
|---|---|---|
| 28 सप्टेंबर | रविवार | अंतिम सामना |
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












