Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
देशामध्ये मुंबईकर सर्वात जास्त कर देतो. मात्र, तरीही मुंबईतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याचं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं होतं.
आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला उत्तर देत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर खोचक टीका केली होती. शेलार यांच्या या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Mumbaikars have noticed who is robbing Mumbai
ट्विट करत अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “काय तो साक्षात्कार आशिष शेलार तुमचा शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का?
सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी ‘उडवल्या’ जात आहेत त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही.
काय तो साक्षात्कार @ShelarAshish तुमचा! शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का? सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो… https://t.co/j7RSXBKO55
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 8, 2023
दरम्यान, आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे गटाला धारेवर धरलं होतं. ते म्हणाले, “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले.
26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली, झाड पडून काहीजण गेले, संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले, तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते.
मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा…! आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका! मुंबईकर हो!”
महत्वाच्या बातम्या
- Omicron | नागरिकांनो काळजी घ्या! पुण्यात आढळला ओमीक्रोनचा नवा व्हेरिएंट
- Best Bus Strike | अखेर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे
- Sanjay Raut | “… तर मी खासदारकी सोडेल”; संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा एकदा उतरले मैदानात; ठाकरे गटावर केला 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- Ashish Shelar | अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय? ठाकरे गटाच्या प्रश्नाचं आशिष शेलारांनी दिलं उत्तर