Kirit Somaiya | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या व्हिडिओनंतर सोमय्यांना विरोधकांनी चांगलंच घेरलं होतं. यानंतर सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे.
100 crores scam in covid center
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. सोमय्या यांनी पुन्हा एकदा आर्थिक घोटाळे समोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कोविड काळामध्ये सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले, “रु. 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा.
1850 खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च रु 10.94 कोटी. मुंबई महानगरपालिकेने दर महिने रु. 3,59,78,389 प्रमाणे 25 महिने भाडे दिले. ठाकरे सरकारचे मित्र ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 100 कोटी रुपये गिफ्ट. चौकशीची होणार.
रु. 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा
1850 खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च रु 10.94 कोटी. मुंबई महानगरपालिकेने दर महिने रु. 3,59,78,389 प्रमाणे 25 महिने भाडे दिले
ठाकरे सरकारचे मित्र ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 100 कोटी रुपये गिफ्ट. चौकशीची होणार pic.twitter.com/qc3SLnJF1P
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 8, 2023
दरम्यान, मुलुंड येथील कोविड हॉस्पिटलच्या ऑक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रा. लि. कंपनीच्या 100 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे.
याबाबत किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी, कंपनी मंत्रालय यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
त्याचबरोबर त्यांच्या या आरोपावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar | अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय? ठाकरे गटाच्या प्रश्नाचं आशिष शेलारांनी दिलं उत्तर
- Sanjay Raut | “भाजपनं मतदानासाठी माणसं विकत घेतली..”; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
- Uddhav Thackeray | अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे नक्की काय? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Narendra Modi | नरेंद्र मोदींसोबत आज महाराष्ट्रातील NDA च्या खासदारांची बैठक
- Prakash Ambedkar | अजित पवार गेल्यावर शरद पवारांकडं काय राहिलं? – प्रकाश आंबेडकर