🕒 1 min read
Narendra Modi | नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील NDA च्या खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रभर विशेष लक्ष देत असल्याचं दिसून आलं आहे.
48 MPs from Maharashtra and Goa will attend the NDA meeting
आज संध्याकाळी 06 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंग आदी नेते देखील उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवारांकडं काही शिल्लक राहिलं नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहे.
मात्र, अजित पवार त्यांना सोडून गेल्यानंतर त्यांच्याकडं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. भाजपसोबत जाताना अजित पवार सर्व काही घेऊन गेले आहे. त्यामुळं शरद पवारांचं पक्षातील आणि जनतेतील वजन कमी झाल्याचं दिसून आलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Prakash Ambedkar | अजित पवार गेल्यावर शरद पवारांकडं काय राहिलं? – प्रकाश आंबेडकर
- Ashish Shelar | “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत…”; आशिष शेलारांनी ठाकरे गटाचे कान टोचले
- Bhalchandra Nemade | औरंगजेब हिंदु द्वेष्टा नव्हता; भालचंद्र नेमाडेंचं वादग्रस्त वक्तव्य
- Rohit Pawar | “अन्याय पद्धतीने काढलेली खासदारकी…”; राहुल गांधींना खासदारकी मिळाल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde | “आधी वाघाची डरकाळी तर आता नागाची फुसफुस ऐकू…”; शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










