Share

Ashish Shelar | “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत…”; आशिष शेलारांनी ठाकरे गटाचे कान टोचले

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. देशामध्ये मुंबईकर सर्वात जास्त कर देतो. मात्र, तरीही मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ठाकरे गटला धारेवर धरलं आहे. ट्विट करत … Read more

Published On: 

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

देशामध्ये मुंबईकर सर्वात जास्त कर देतो. मात्र, तरीही मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ठाकरे गटला धारेवर धरलं आहे.

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत
◆रस्त्यावर खड्डे पडले
◆मुंबईची तुंबई झाली
◆अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले
◆26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली
◆झाड पडून काहीजण गेले
◆संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले
■ तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते,
मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा…! आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका! मुंबईकर हो!

म्हणून आम्ही वारंवार सांगतोय
लबाड लांडगा ढोंग करतोय
मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय!!”

We will make Mumbaikars toll free – Aditya Thackeray

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत रस्त्यांच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावलाय!

आता तर मुंबई महानगरपालिकेवर पूर्व आणि पश्चिम महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी टाकल्यावरही टोल मात्र MSRDC मार्फत घेतला जातोय, शिवाय मुंबईचा स्ट्रीट टॅक्स आहेच.

हा दुहेरी टॅक्स मुंबईकरांनी का भरावा? त्यातच मुंबईच्या महामार्गांवरच्या होर्डिंग्सचा महसुल मात्र मुंबई महानगरपालिकेला मिळत नाहीये. आज ह्याच विषयावर पत्रकार परिषद घेतली आणि मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून काय काय मागण्या केल्या ह्याची माहिती दिली.

आम्ही सत्तेत आल्यावर मुंबईकरांची ह्या अन्यायकारक टोलपासून सुटका करणारच! पण आत्ताच्या सरकारकडून मुंबईकरांना लुटण्याचा जो खेळ चाललाय त्याचा पर्दाफाश केला.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही