Share

Sanjay Shirsat | “सोनियाचा दिवस कधी येणार याची वाट…”; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) खोचक टीका केली. ‘शिवसेना फोडणारा औरंग्या’, असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना म्हणाले. ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट प्रत्युत्तर दिलं आहे. Currently, Uddhav Thackeray has … Read more

Published On: 

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) खोचक टीका केली.

‘शिवसेना फोडणारा औरंग्या’, असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना म्हणाले. ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट प्रत्युत्तर दिलं आहे.

Currently, Uddhav Thackeray has no work – Sanjay Shirsat

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “सध्या उद्धव ठाकरे यांना काही काम नाही. राहुल गांधी 31 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये दाखल होणार आहे. त्याआधी ठाकरेंकडे दुसरे कोणतंही काम नाही.

राहुल गांधी कधी येतील? त्यांच्या जेवणासाठी काय बनवायचं? त्यांना काय वाढायचं? या विचारांमध्ये सध्या उद्धव ठाकरे मग्न आहेत. राहुल गांधी मुंबईत आल्यावर त्यांच्या बाजूला कुणी उभं राहायचं? मी की संजय राऊत यांनी? यावर सध्या ते विचार करत आहे.

सोनियाचा दिवस कधी येणार? याची ते आतुरतेने वाट बघत आहे. तोपर्यंत त्यांना दुसरं काम नाही. तोपर्यंत ते अशी भंपकबाजी करत राहणार.”

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना मुळात इतिहास माहीत नसतो. मात्र, हल्ली उद्धव ठाकरे यांना इतिहासाची जास्तच आठवण यायला लागली आहे.

त्यामुळे त्यांचं अफजलखान, औरंग्या आणखी काय काय सुरू आहे. मी बाळासाहेबांप्रमाणे बोललो तर लोक माझं ऐकतील, असं त्यांना वाटत आहे. मात्र, लोकांना आता त्यांचा कंटाळा आलाय.

फक्त भंपकबाजी करून ते आपलं अस्तित्व टिकवत आहे. उद्धव ठाकरेंवर एक दिवस असा येईल की, ते म्हणतील तिकडं कोण आहे? तेव्हा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांच्या आजूबाजूला कुणी नसेल. त्यांच्या बाजूला फक्त संजय राऊत उभे दिसतील.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही