Ashish Shelar | मुंबई: मुंबईतील रंगशारदा येथे ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलत असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मोदी (Narendra Modi) सरकारवर खोचक टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस फक्त मस्टरमंत्री आहे का? असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची ओळख फक्त घरबशा मंत्री असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray need not worry about BJP – Ashish Shelar
आशिष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाची चिंता करायची गरज नाही. त्यांनी स्वतःची चिंता करावी. कारण त्यांचा पक्ष, चिन्ह, नेतृत्व, परिवार सगळं संपलं आहे.
इतकच काय त्यांचे आमदार आणि मंत्री देखील गेले आहेत. ठाकरे गटाची वृत्ती सत्तेच्या गिधाडासारखी झाली आहे. त्यामुळं दुसऱ्याच्या घरात डोकवून बघण्याचा चोंबडेपणा त्यांनी आता बंद करावा.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना मस्टरमंत्री म्हणतात. मात्र देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही परफॉर्मन्स मंत्री आहे. तर उद्धव ठाकरेंची ओळख घरबाशा मुख्यमंत्री आहे. उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर बोलण्याची कुवत नाही.
म्हणून त्यांनी या भानगडीमध्ये पडू नये. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आले आहे. त्यावर त्यांनी आधीच आम्हाला स्पष्टीकरण द्यावं आणि मग आमच्या पक्षावर टीका करावी.”
यावेळी बोलत असताना आशिष शेलार यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चाबाबत देखील वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “हिंदू एकत्र आल्यावर उद्धव ठाकरेंच्या पोटात का दुखतं काय माहित?
त्याचबरोबर उद्धव ठाकरे बुरखा बंदीच्या विषयावर तोंड उघडायला तयार नाही, इथेच प्रश्न निर्माण होतो. उद्धव ठाकरे यांना औंरंगजेबाचं उदत्तीकरण करायचं आहे”, असही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | “हुकूमशाही सरकारविरोधी सुरू असलेल्या लढ्यातील…”; राहुल गांधींना खासदारकी मिळाल्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ! भिडेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल
- Rahul Gandhi | राहुल गांधींना खासदारकी बहाल, पुन्हा दिसणार संसदेच्या अधिवेशनात
- Sanjay Raut | जयंत पाटील आणि आमचा DNA सारखाचं – संजय राऊत
- Nitesh Rane | उद्धव ठाकरे म्हणजे नमक हराम माणूस – नितेश राणे