Sanjay Raut | जयंत पाटील आणि आमचा DNA सारखाचं – संजय राऊत

Sanjay Raut | नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवस पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अमित शाह यांची भेट घेतली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

यानंतर जयंत पाटील अजित पवार गटात सामील होणार असल्याचं देखील बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांचा आणि आमचा डीएनए सारखाचं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

We are not cowards – Sanjay Raut

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “इंडिया आघाडी संदर्भात झालेल्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित होते. जयंत पाटील यांना आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो.

आपला नेता आणि आपला पक्ष संकटात असताना, पळून जाणाऱ्या डरपोक पळकुट्या नेत्यांपैकी जयंत पाटील नाही. याची मला पूर्ण खात्री आहे. जयंत पाटील आणि आमचा डीएनए सारखाचं आहे. आम्ही पळकुटे आणि डरपोक नाही.”

उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांना फार गांभीर्याने घेऊ नका. त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही, असं मी वारंवार सांगत आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्यावर काल जोरदार फटकेबाजी केली आहे आणि ती पुरेशी आहे. उद्धव ठाकरे यांच्या त्या फटकेबाजीनं महाराष्ट्र आणि भारतीय जनता पक्ष घायाळ झाला आहे.

महाराष्ट्रातलं सरकार ज्या पद्धतीनं सुरू आहे आणि सध्या सरकार ज्या पद्धतीनं एकमेकांवर फुलं उधळायचं काम करत आहे, ते सर्व वरवरचं आहे. अंतर्गत नेमकं काय चाललं आहे हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे.”

यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मणिपूर मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मणिपूरचं सरकार ताबडतोब बडखास्त व्हायला हवं.

त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा. इतर राज्यामध्ये असा हिंसाचार घडला असता तर भाजपनं त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. मात्र, मणिपूरमध्ये त्यांचं राजकारण सुरू आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.