Devendra Fadnavis | नाशिक: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनाव प्रकरणावरून गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.
गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काल (04 ऑगस्ट) या याचिकेवर सुनावणी झाली आहे.
राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला आहे. यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र चालवलं आहे.
Until yesterday, Congress leaders were cursing the Supreme Court – Devendra Fadnavis
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उच्चपदस्थ असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारची विधाने करू नये असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
मात्र, राहुल गांधींनी जे म्हटलं ते किती अयोग्य आहे? कालपर्यंत काँग्रेस नेते सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देत होते. मात्र, त्यांच्या बाजूनं निर्णय होताचं काँग्रेस नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं गुणगान गायला सुरुवात केली आहे. हे बघून आम्हाला अत्यंत समाधान वाटत आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “कालपर्यंत ही लोकं काहीतरी वेगळं बोलत होती आणि आज काही वेगळं बोलत आहे. आमच्या बाजूनं निर्णय झाला तर सुप्रीम कोर्ट चांगलं आणि आमच्या विरोधात निर्णय झाला तर सुप्रीम कोर्ट वाईट, हे त्यांच्या कृत्यातून स्पष्टपणे दिसून आलं आहे.
देशातील घटनात्मक संस्थांना काही लोक नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर या संस्थांचं पावित्र्य देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काल घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होताना दिसत आहे.”
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राहुल गांधींचा अभिनंदन केलं होतं. ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही.
राहुल जी गांधी यांच्याबाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राहुलजी गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | भाजपला मोठा धक्का! कोल्हापुरातील बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
- Devendra Fadnavis | “आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली म्हणून…”; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका
- Devendra Fadnavis | शिस्त आणि संवेदना मोडून चालणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना सल्ला
- Sharad Pawar | शरद पवार गटाची अधिवेशन संपताचं बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Uddhav Thackeray | “आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे काहींची अवस्था झाली…”; ठाकरे गटाच्या निशाण्यावर कोण?