Share

Sharad Pawar | भाजपला मोठा धक्का! कोल्हापुरातील बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

Sharad Pawar | कोल्हापूर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बहुतांश आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर शरद पवार यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरातील एका बड्या बीजेपी नेत्यांनं राष्ट्रवादी शरद पवार … Read more

Published On: 

Sharad Pawar | कोल्हापूर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बहुतांश आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.

यानंतर शरद पवार यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरातील एका बड्या बीजेपी नेत्यांनं राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाजप नेते सुरेश घाडगे (Suresh Ghadge) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला आहे.

सुरेश घाडगे यांनी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांसाठी शरद पवार गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

त्यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गट मजबूत झाला असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार गटाकडून चंदगड विधानसभा मतदारसंघात सुरेश घाडगे यांच्या माध्यमातून पुन्हा नवीन चेहरा दिसणार आहे.

I will do development work under the leadership of Sharad Pawar – Suresh Ghadge

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केल्यानंतर सुरेश घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “सत्तेत असताना मजा करायची आणि नंतर साथ सोडून द्यायची ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही.

म्हणून मी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आमच्या तालुक्यात अनेक विकास कामं करणार आहे.”

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सुरेश घाडगे इच्छुक असल्याचं दिसून आलं आहे. यासाठी शरद पवार गटही त्यांच्या नावाचा विचार करू शकतो, अशा चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश घाडगे लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही