Jitendra Awhad | आज मी वाढदिवसानिमित्त कुणालाही भेटणार नाही; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज (5 ऑगस्ट) वाढदिवस आहे. दरवर्षी जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येतात.

मात्र, यावर्षी वाढदिवसानिमित्त आव्हाडांनी कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

I will not celebrate my birthday – Jitendra Awhad

ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) म्हणाले, “उद्या 5 ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं.

वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.

देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार.

हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही.

तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.

लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात.

हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.