Share

Rahul Gandhi | आ रहा हूं, सवाल जारी रहेंगे; खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधींचा मोदींना इशारा

Rahul Gandhi | नवी दिल्ली: ‘मोदी’ आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणावरून राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळं राहुल गांधींचा खासदारकी मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना … Read more

Published On: 

Rahul Gandhi | नवी दिल्ली: ‘मोदी’ आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

या प्रकरणावरून राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

या शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळं राहुल गांधींचा खासदारकी मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर काँग्रेसनं (Rahul Gandhi) एक ट्विट केलं आहे. “आ रहा हूं, सवाल जारी रहेंगे”, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्वीटच्या माध्यमातून काँग्रेसनं नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला इशारा दिला आहे. आता काँग्रेसच्या या ट्विटवर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi’s statement was disastrous – Supreme Court

दरम्यान, या विषयावर निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाला चांगलं सुनावलं आहे. “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं विधान आपत्तीकारक होतं.

मात्र, त्यांना एवढी मोठी शिक्षा देण्याचं कारण कनिष्ठ न्यायालयानं स्पष्ट केलेलं नाही. त्याचबरोबर या प्रकरणावर गुजरात उच्च न्यायालयानं विचार केला नाही.

कोर्टानं एवढी शिक्षा देण्यामागचं कारण अद्याप दिलेलं नाही? ट्रायल कोर्टाला एवढी मोठी शिक्षा देण्याची काय गरज होती?”, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सदस्यत्व आपोआप बहाल होतं. यासाठी फक्त लोकसभा अध्यक्षांना एक अर्ज करावा लागतो.

या अर्जानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा लोकसभेत दिसू शकतात. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातच राहुल गांधींनी ही प्रक्रिया पूर्ण केली, तर त्यांना कामकाजात सहभागी होण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही