Share

Devendra Fadnavis | बेपत्ता मुली आणि महिलांचा शोध घेण्याच्या टक्केवारीत सुधारणा – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | मुंबई: विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यामध्ये घट झाली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर बेपत्ता मुली आणि महिलांच्या शोध घेण्याच्या टक्केवारीत सुधारणा झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “वेगवेगळ्या कारणांमुळे मुली आणि महिला गायब होतात. काही घरून निघून गेलेल्या असतात, काही हरवलेल्या असतात, काही पळून गेलेल्या असतात.

यामध्ये आपण दोन कॅटेगरी करू शकतो. एक म्हणजे 18 वर्षाखालील आणि दुसरी 18 वर्षावरील. 2021 मध्ये याबाबत जी काही प्रकरणं झाली, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 87% महिला सापडल्या आहे.

त्यानंतर 2022 मध्ये ही संख्या 80 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. त्याचबरोबर जानेवारी 2023 ते मे 2023 दरम्यान घडलेल्या घटनांमधील 83 टक्के घटना सोडवण्यात आल्या आहे. हे आकडे लवकरच 90% पर्यंत पोहोचणार आहे.”

There is no fear of law and order in the state – Devendra Fadnavis

दरम्यान, राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

ते म्हणाले, “राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. त्यामुळं मुलींवर होणारे अत्याचार आणि दंगली दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे.

राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. ठाणे जिल्ह्यात 184.33 टक्के तर नागपूर शहरामध्ये 332.91 टक्के गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांच्या जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis | मुंबई: विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुली आणि महिलांच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now