Vijay Wadettiwar | “मी भुजबळ आणि फडणवीसांच्या तालमीतील पैलवान…”; विरोधी पक्षनेते पद मिळाल्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar | मुंबई: आज विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळाली आहे.

यानंतर वडेट्टीवार यांनी सर्वांचे आभार मानले आहे. मी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तालमीत तयार झालेला पैलवान असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

I came here from a very poor background – Vijay Wadettiwar

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “मी अतिशय गरीब परिस्थितीतून इथपर्यंत आलो आहे. आतापर्यंतचा माझा प्रवास खडतर होता. त्याचबरोबर मी सामान्य माणूस आणि गरिबांच्या वेदना अत्यंत जवळून पाहिलेल्या आहेत.

त्यामुळं जोपर्यंत मी विरोधी पक्षनेते पदावर असेल, तोपर्यंत मी निष्ठा आणि इमानदारीने काम करेल. मी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचं विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलं आहे. मी त्यांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे.”

पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “मी एक लढणारा व्यक्ती आहे. या पदासाठी माझी निवड करून तुम्ही सर्वांनी मला पुढे लढण्यासाठी आणखीन बळ प्रदान केलं आहे.

200 आमदार असताना मला ही संधी मिळाली आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

त्यांचे प्रश्न दूर करणं आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणं ही आपली जबाबदारी आहे. राजकारण एका मर्यादेपर्यंतच केलं पाहिजे. त्यानंतर जनसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष दिलं पाहिजे.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, “विजय वडेट्टीवार आतापर्यंत अनेकदा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे.

त्यांनी आपली विचारधारा कायम ठेवली आहे. या गोष्टीसाठी मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते पदाचं काम योग्य पद्धतीने पार पाडतील, याची मला खात्री आहे. त्याचबरोबर त्यांना ही जबाबदारी पाच वर्ष सांभाळता यावी, अशी मी इच्छा व्यक्त करतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.