Devendra Fadnavis | मुंबई: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची आज विधानसभा विरोधी पक्षनेते निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राज्य सरकारमध्ये आता कोणताही बदल होणार नाही. आम्ही ज्या पदावर आहोत, त्याच पदावर राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Eknath Shinde is a hero – Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 2019 मध्ये एक विक्रम केला आहे. त्यावर्षी त्यांनी सत्ता परिवर्तन करून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.
त्यानंतर ते उत्कृष्ट पद्धतीनं काम करत आहे. म्हणून एकनाथ शिंदे हिरो आहे. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) हे 2019 चे खरे हिरो आहे. त्यावर्षी अजित पवार आधी माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले.
त्यानंतर ते महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री झाले. मग त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आणि आता ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आहे. म्हणून अजित पवार हे 2019 मधील खरे हिरो आहे.
पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “अजित पवार यांच्यानंतर माझा नंबर लागतो. कारण मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यानंतर मी विधानसभा विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी सांभाळली.
तर सध्या मी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. आम्ही ज्या पदावर आहोत, त्याच जबाबदाऱ्या आम्ही सांभाळणार आहोत.”
दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती.
त्याचबरोबर अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटलं होतं. अशात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या वक्तव्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | “नाना हमारे साथ है लेकीन…”; मुख्यमंत्री शिंदेंचं खळबळजनक विधान
- Vijay Wadettiwar | काँग्रेसच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांची मान्यता! विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती
- Ajit Pawar | …अन् अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले
- Sanjay Raut | “… म्हणून 16 आमदार अपात्र ठरणार”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
- Sanjay Raut | “भाजपसोबत असणाऱ्यांना कर्जमाफी दिली…”; नितीन देसाईंच्या आत्महत्येवर संजय राऊतांची प्रतिक्रिया