Eknath Shinde | “नाना हमारे साथ है लेकीन…”; मुख्यमंत्री शिंदेंचं खळबळजनक विधान

Eknath Shinde | मुंबई: आज विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विधानसभा विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती केली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळं हे सगळं झालं आहे. ही आपल्या राज्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. नाना हमारे साथ है लेकिन, यह अंदर की बात है, असं मी अजिबात म्हणणार नाही.”

There are two Deputy Chief Ministers working in Maharashtra – Eknath Shinde

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, सध्या महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्री काम करत आहे. राज्य सरकारचं काम सध्या जोरात सुरू आहे.

नेहमी फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहिलं पाहिजे. जो विरोधी पक्ष नेता होतो, तो भविष्यामध्ये मुख्यमंत्री होतो, हे इतिहास सांगत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षनेते होते. त्याचबरोबर मी देखील विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे.”

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं (Eknath Shinde) होतं.त्यानंतर संख्याबळ जास्त असल्यामुळं विरोधी पक्षनेते पदावर विराजमान होण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती.

त्यानुसार विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसनं 01 जुलै रोजी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. आज विधानसभा अध्यक्षांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेते पद नियुक्तीला मान्यता दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.