Share

Vijay Wadettiwar | काँग्रेसच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांची मान्यता! विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती

Vijay Wadettiwar | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. त्यानंतर संख्याबळ जास्त असल्यामुळं काँग्रेसकडं महाराष्ट्रातील विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद चालून आलं होतं. त्यानुसार विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसनं 01 जुलै रोजी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

त्यानंतर संख्याबळ जास्त असल्यामुळं काँग्रेसकडं महाराष्ट्रातील विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद चालून आलं होतं. त्यानुसार विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसनं 01 जुलै रोजी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे केली होती.

Rahul Narvekar has approved the appointment of Vijay Vadettiwar as Leader of Opposition

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना विधानसभा विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेते पद नियुक्तीला मान्यता दिली आहे. सभागृहात याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.

त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदीचा पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्या शपथविधीनंतर विधानसभेचा नवा विरोधी पक्षनेता कोण असेल? असा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यानंतर आज सर्वांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही