Sanjay Raut | नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता.
अशात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याची हिंमत विधानसभा अध्यक्षांमध्ये दिसत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “16 आमदार कायद्याने अपात्र होत आहेत. मात्र, त्यांना अपात्र ठरवण्याची हिंमत विधानसभा अध्यक्षांमध्ये नाही.
विधानसभा अध्यक्ष हा निर्णय देण्यासाठी ज्या अर्थी वेळ लावत आहे. त्या अर्थी कायद्याने हे सर्व आमदार अपात्र ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे.
मात्र, सध्या सर्व घटनात्मक पद राजकीय दबावाखाली काम करत आहे. हे आम्ही राष्ट्रपती, राज्यपाल अशा अनेक पदांच्या संदर्भात बघत आहोत.”
We only expect from the Supreme Court -Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “आम्हाला फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे. आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न होईल. 17 सप्टेंबरपर्यंत आमची सुनावणी पुढे गेली असली तरी त्याबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही.
आम्ही 11 ऑगस्टपर्यंत वाट पाहणार आहोत. त्याचबरोबर आमची लीगल टीम अत्यंत मजबूत आहे. आम्ही आशावादी नाही तर आम्हाला विश्वास आहे की विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भातला निर्णय कायदा आणि घटनात्मक पद्धतीनं घ्यावा लागेल.”
यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आपल्या कर्तुत्वाचा ठसा नितीन देसाई यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये उमटवला आहे.
देसाईंनी एनडी स्टुडिओसारखा भव्य स्टुडिओ देशामध्ये उभा केला आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. अशा मोठ्या कलाकाराचा काल दुर्देवी मृत्यू झाला. नितीन देसाईंना आपला एनडी स्टुडिओ डोळ्यासमोर उध्वस्त होताना दिसत होता. ते त्यांना सहन झालं नाही, म्हणून त्यांनी आत्महत्या केली.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “भाजपसोबत असणाऱ्यांना कर्जमाफी दिली…”; नितीन देसाईंच्या आत्महत्येवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Sambhaji Bhide | भाजपनं संभाजी भिडे नावाचा वळू सोडलायं; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
- Sharad Pawar | अखेर हा वृक्ष उन्मळून पडला; ना. धो. महानोर यांच्या निधनानंतर शरद पवार भावूक
- Uddhav Thackeray | “नावात समृद्धी असलेल्या महामार्गावर…”; ठाकरे गटाची राज्य सरकारवर खोचक टीका
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंना मोठा झटका! येत्या 08 दिवसात पोलिसांत हजर राहण्याचे आदेश