Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: आज विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांनी विजय वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील ट्विट करत विजय वडेट्टीवार यांना अभिनंदन केलं आहे. श्री. विजय वडेट्टीवार हे विदर्भातील झुंजार आणि लढावू नेतृत्व आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Vijay Wadettiwar is a militant leader from Vidarbha – Jayant Patil
ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. सभागृहात याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्री. विजय वडेट्टीवार हे विदर्भातील झुंजार आणि लढावू नेतृत्व आहे. सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर त्यांनी विरोधी पक्षाचे आमदार म्हणूनही आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली.
अशा कठीण प्रसंगात एक आक्रमक व्यक्ती त्या पदावर बसणे आवश्यक होते. मला वाटतं या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड झाली आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा आगडोंब उसळला आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत मोठा बदल घडत आहे.
अशा परिस्थितीत विजयभाऊ विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देतील याचा मला विश्वास आहे. याआधी अनेक विरोधी पक्षनेते होऊन गेले ज्यांनी या खुर्चीला न्याय दिला आणि आपले संबंध कायम ठेवले.
नारायण राणे साहेब विरोधी पक्षनेते असताना त्यांचा प्रचंड दरारा होता. प्रत्येक विषयात त्यांचा चांगला अभ्यास असे, मी अर्थमंत्री असताना अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अर्थसंकल्पाविरोधात जोरदार भाषण करत.
आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. सभागृहात याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्री. विजय वडेट्टीवार हे विदर्भातील झुंजार आणि लढावू नेतृत्व आहे. सभागृहाच्या…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 3, 2023
त्यांची मांडणी प्रचंड प्रभावी असायची. खडसे साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचाही स्वभाव तसाच होता. विरोधी पक्षात आणि सत्ताधारी पक्षात नेहमीच सौहार्द राहिले आहे ही आजपर्यंतची प्रथा आहे.
हे सभागृह खेळीमेळीने चालायला हवे. सभागृहात मुंडे साहेब माझ्या विरोधात जोरदार भाषण करत आणि चहासाठी माझ्याच दालनात यायचे. विरोध हा फक्त त्या विषयापूर्ता मर्यादित असायला पाहिजे. मला विश्वास आहे की या सभागृहात ते पाळले जाईल.
२०१९ साली विजूभाऊ विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला सत्ता मिळवून दिली. आज पुन्हा त्यांचे विरोधी पक्षनेते होणे हा शुभ संदेश आहे.
मला विश्वास आहे की ते या पदाला योग्य न्याय देतील, आपल्या राज्यात गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडतील. मी त्यांना माझ्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो.”
महत्वाच्या बातम्या
- Bhaskar Jadhav | “दादा तुम्ही त्यांच्या मांडीवरून मानगुटीवर…”; भास्कर जाधवांचा शिंदे गटावर घणाघात
- Ajit Pawar | मला टोमणे मारायची सवय नाही; अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
- Devendra Fadnavis | अजित पवार मुख्यमंत्री होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
- Eknath Shinde | “नाना हमारे साथ है लेकीन…”; मुख्यमंत्री शिंदेंचं खळबळजनक विधान
- Vijay Wadettiwar | काँग्रेसच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांची मान्यता! विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती