Share

Ajit Pawar | मला टोमणे मारायची सवय नाही; अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Ajit Pawar | मुंबई: विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची आज विधानसभा विरोधी पक्षनेते पदी निवड झाली आहे. याबद्दल सर्वांनीच त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी बोलत असताना अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मला टोमणे मारायची सवय नसल्याचं अजित पवार यांनी … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची आज विधानसभा विरोधी पक्षनेते पदी निवड झाली आहे. याबद्दल सर्वांनीच त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी बोलत असताना अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मला टोमणे मारायची सवय नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “अशोक चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेता पदावर विराजमान होतील, असं आम्हाला वाटलं होतं. विरोधी पक्षनेते पद द्यायचं म्हटलं तर विजय वडेट्टीवार यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर येतं.

पण जे लढायचं ते तुम्ही लढा, नंतर पुन्हा चांगले दिवस आल्यानंतर आम्ही आहोतच, असा काहींचा स्वभाव असतो. यावेळी मी कुणाचंही नाव घेत नाही. मात्र, माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही.”

Vijay Wadettiwar has stood up many times to solve the problems of the people – Ajit Pawar

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी विजय वडेट्टीवार अनेकदा रस्त्यावर उतरले आहे. त्यांनी आपली वैचारिक बैठक कायम ठेवली आहे.

या गोष्टीचं मी मनापासून कौतुक करतो. विजय वडेट्टीवार योग्य पद्धतीनं विरोधी पक्षनेते पदाचं काम करतील याची मला खात्री आहे. त्याचबरोबर त्यांना पाच वर्षे ही जबाबदारी सांभाळता येईल, अशी मी इच्छा व्यक्त करतो.

दरम्यान, आजकाल टोमणे म्हटलं तर उद्धव ठाकरे यांचं नाव समोर येतो. कारण उद्धव ठाकरेंवर भारतीय जनता पक्ष नेहमी टोमण्यावरून टीका करत असते.

अशात अजित पवार यांनी केलेल्या उल्लेखावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. टोमणे मारायचा माझ्या स्वभाव नाही, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) उद्धव ठाकरे यांना तर म्हटलं नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही