Monsoon Session | आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा

Monsoon Session | मुंबई: आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करू शकतात.

त्याचबरोबर आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळं या मुद्द्यावरून विरोधक आज सभागृहात आक्रमक होऊ शकतात.

The Monsoon session will end today with a tea party

आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना महागाईच्या मुद्द्यावरून देखील घेरू शकतात.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भाषण होतील.

त्याचबरोबर विरोधी पक्षातील प्रमुख नेते देखील आज भाषण करतील. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या चहापानाने आज पावसाळी अधिवेशनाचा शेवट होईल.

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं.

यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न, पावसामुळं झालेलं नुकसान, संभाजी भिडे यांचा मुद्दा, समृद्धी मार्गावर झालेले अपघात, महिलांचे प्रश्न, धार्मिक हिंसाचार इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. या मुद्द्यांवरून सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

दरम्यान, 01 जुलै रोजी काँग्रेसनं विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांच्या नावाची शिफारस राहुल नार्वेकर यांच्याकडं  केली होती.

त्यानंतर काल (03 ऑगस्ट) विधानसभा अध्यक्षांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेते पद नियुक्तीला मान्यता (Monsoon Session) दिली आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडं  विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.