Ambadas Danve | राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास हे सरकार अयशस्वी ठरलयं – अंबादास दानवे

Ambadas Danve | मुंबई: आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्या जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

There is no fear of law in the state – Ambadas Danve

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “राज्यामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळे दंगली आणि मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

महापुरुषांचा अपमान करणे, महिला लोकप्रतिनिधींवर अश्लील टीका करणे अशा कृतीतून काही जण प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र, सरकार यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. विरोधी पक्षांच्या आमदारावर कारवाई करण्यासाठी सरकार नेहमी तयार असतं. त्यामुळे सध्याचं सरकार दुटप्पी भूमिका बजावत आहे.”

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. नागपूर शहरामध्ये 332.91 टक्के तर ठाणे जिल्ह्यात 184.33 टक्के गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचबरोबर मुंबई आणि ठाण्यात पहाटेपर्यंत डान्सबार सुरू असल्याचं दिसून आलं आहे. राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे.”

दरम्यान, आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस (Ambadas Danve) आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यावरून घेरलं होतं.

यामध्ये समृद्धी महामार्ग झालेले अपघात, धार्मिक हिंसाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता. या मुद्द्यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.