Share

Devendra Fadnavis | औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीस

🕒 1 min read Devendra Fadnavis | मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले होते. अशात आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadnavis | मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले होते.

अशात आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Aurangzeb cannot be the hero of Indian Muslims – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये औरंगजेबाच्या मिरवणुकी निघाल्या. त्याचबरोबर काही लोकांनी मुद्दाम औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते.

औरंगजेब हा परकीय आहे. त्यामुळं तो भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारतीय मुस्लिमांचे हिरो आहेत.

त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज देखील सर्वांचे हिरो आहे. राज्यामध्ये औरंगजेबाचा पुरस्कार करताना कोणी दिसलं तर त्याला आम्ही सोडणार नाही.”

दरम्यान, एकीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सभागृहात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत भाष्य केलं  आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर या मुद्द्यावरून खोचक टीका केली आहे.

ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करुन तिचा मृतदेह जनावरांच्या चाऱ्यात लपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना अतिशय संतापजनक असून, याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करुन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राज्याचे गृहखाते सक्षम नसल्याने राज्यात गुन्हेगार मोकाट असून महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही