Share

Supriya Sule | “राज्याचे गृहखाते सक्षम नसल्याने…”; सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांवर खोचक टीका

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. आज सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अशात जळगाव जिल्ह्यातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला … Read more

Published On: 

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. आज सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अशात जळगाव जिल्ह्यातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

The criminal is free in the state – Supriya Sule

ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करुन तिचा मृतदेह जनावरांच्या चाऱ्यात लपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना अतिशय संतापजनक असून, याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करुन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राज्याचे गृहखाते सक्षम नसल्याने राज्यात गुन्हेगार मोकाट असून महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.”

दरम्यान, आज सभागृहात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “अनेक कारणांमुळे महिला गायब होतात.

यामध्ये काही महिला पळून गेलेल्या असतात तर काही घर सोडून निघून जातात. तर काही महिला आणि मुली हरवलेल्या असतात. यांना आपण दोन कॅटेगरीमध्ये विभागू शकतो.

एक म्हणजे 18 वर्षाखालील आणि दुसरी म्हणजे 18 वर्षावरील. 2021 मध्ये आतापर्यंतच्या महिला आणि मुली गायब झाल्या होत्या, आतापर्यंत त्यांच्यातील 87 टक्के महिला सापडल्या आहे.

तर 2022 मध्ये ही संख्या 80% वर जाऊन पोहोचली आहे. जानेवारी 2023 ते 2023 दरम्यान घडलेल्या घटनांमधील 83 टक्के घटना सोडवण्यात आल्या आहे. हा आकडा लवकरच 90% पर्यंत पोहोचणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही