Narendra Modi | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (India) म्हणजेच इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Democratic Inclusive Alliance) नावाची आघाडी स्थापन केली आहे.
विरोधकांच्या या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोचक टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
The name UPA has been defamed – Narendra Modi
बिहारमध्ये एनडीए खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलत असताना मोदींनी (Narendra Modi) विरोधकांच्या आघाडीवर खोचक टीका केली आहे.
विरोधकांच्या इंडिया आघाडीवर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “यूपीए हे नाव बदनाम झालं आहे. म्हणून आता विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया नाव दिलं आहे. मात्र, विरोधकांची ही आघाडी इंडिया नाही तर घमंडीया आहे.”
दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. यामध्ये पहिली बैठक बिहारच्या पाटणा शहरात झाली. तर दुसरी बैठक कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये पार पडली.
विरोधकांच्या आघाडीची पुढची म्हणजेच तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी ही बैठक पार पडणार आहे.
या बैठकीमध्ये विरोधकांच्या आघाडीचा नवा चेहरा आणि आघाडीची समन्वय समिती निश्चित होण्याचा अंदाज आहे. म्हणून या बैठकीची विरोधकांसह सत्ताधारी देखील वाट बघत आहे.
दरम्यान, विरोधकांच्या या आघाडीमध्ये तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम इत्यादी पक्षांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | न्याय, सत्य आणि लोकशाहीचा दणदणीत विजय; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- Supriya Sule | कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही; राहुल गांधींना खासदारकी मिळाल्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- Rahul Gandhi | आ रहा हूं, सवाल जारी रहेंगे; खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधींचा मोदींना इशारा
- Raj Thackeray | तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Rohit Pawar | साहेब सांगा न ही आमची फसवेगिरी कधी थांबायची? रोहित पवारांचं ‘ते’ ट्विट चर्चेत