Share

Sanjay Raut | “राहुल गांधींची खासदारकी ठरवून रद्द…”; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | नवी मुंबई: मोदी आडनाव प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांनी गुजरात कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली आहे. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील … Read more

Published On: 

Sanjay Raut | नवी मुंबई: मोदी आडनाव प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

राहुल गांधी यांनी गुजरात कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली आहे.

सुप्रीम कोर्टाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींची खासदारकी ठरवून रद्द करण्यात आली होती, असं संजय राऊत म्हणाले आहे.

Justice is not dead in the Supreme Court – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “गुजरातच्या उच्च न्यायालयाचा संविधान आणि घटनेची काडी मात्र संबंध राहिलेला नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय अजून मेलेला नाही. त्या ठिकाणी अजून न्याय जिवंत आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राहुल गांधी यांच्यावर हल्ले करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी त्यांची सत्ता उलथवतील म्हणून उच्च न्यायालयाला हाताशी धरून त्यांनी राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती.

त्याचबरोबर त्यांनी ठरवून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिवाडा केला आहे. त्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे.”

दरम्यान, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत ते म्हणाले, “न्याय, सत्य आणि लोकशाहीचा दणदणीत विजय.

आमचे नेते राहुलजी गांधी यांना खोट्या खटल्यात सुनावलेल्या अन्यायकारक शिक्षेला आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा केवळ कायदेशीर दिलासा नाही तर आपल्या न्यायव्यवस्थेच्या सामर्थ्याचा, सामाजिक न्याय आणि एकात्मतेच्या आदर्शांप्रती असलेल्या अखंड बांधिलकीचा पुरावा आहे.

खासदारकी रद्द करण्याची शिक्षा झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत राहुलजी गांधी यांनी अतुट धैर्य दाखवले. सशक्त आणि सर्वसमावेशक भारतासाठी त्यांची दृष्टी केवळ वक्तृत्व नसून सकारात्मक बदलाची दिशा असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही