शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या मालकीहक्काबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान, ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर, आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना शिंदे गटाच्यावतीने बाजू मांडण्यात आली.
दरम्यान, सुनावणीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. “जिथे शिंदे, तिथे सौदा” अशी नवी डिक्शनरी आता येत आहे, असे सांगत राऊत यांनी कडक शब्दांत टीकास्त्र सोडले होते. यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊत यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आणि ठाकरे गटावर गंभीर आरोप केले.
Sanjay Shirsat attacks Sanjay Raut
संजय शिरसाट यांनी सांगितले की, “आम्ही सर्व नियम पाळले आहेत, घटनेत जी तरतूद केलीये त्या सगळ्या गोष्टींचं आम्ही पालन केले आहे. खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख यांचा सगळा डाटा आम्ही निवडणूक आयोगाला दिला आहे. कार्यकर्त्यांची नोंदणी त्यांच्याकडे नव्हती. सुप्रीम कोर्टात देखील निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्यावरुन निर्णय घेईल.”
“एकनाथ शिंदेंना सौदा म्हणता, मग तुम्ही ज्यांच्या शासनावर शिवसेना झोपवली तुम्हाला वेश्या म्हणावं का? तुम्ही सिल्व्हर ओकला शिवसेना झुकविली, तुम्हाला समान आर्थी शब्द वेश्या,” अशी वादग्रस्त टिका शिरसाट यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर केली आहे. दरम्यान, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांच्या या टीकेला ठाकरे गट कशी प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आता थेट मुंबई!’ जरांगेंसाठी पैठणमध्ये संतापाचा उद्रेक, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
- ‘माणसं बेशुद्ध पडल्यानंतर मसुदा वाचला का विचारणार?’; जरांगे यांचा सरकारला सवाल
- ‘बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली’; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











