Share

‘आता थेट मुंबई!’ जरांगेंसाठी पैठणमध्ये संतापाचा उद्रेक, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पैठणमध्ये मराठा समाजाने भव्य रास्ता रोको केला. यावेळी शाळकरी मुलांनीही आरक्षणासाठी आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शवला.

Published On: 

Maratha Reservation Protest mass gathering and road block in Paithan Sahyadri Chowk

पैठण | किरण काळे पाटील :  मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची (Manoj Jarange ) प्रकृती खालावत चालल्याने मराठा समाजाची धाकधूक वाढली असून, याच चिंतेतून पैठणमध्ये पुन्हा एकदा संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हजारो मराठा समाजबांधवांनी रस्त्यावर उतरून पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील सह्याद्री चौकात भव्य रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. यावेळी ‘आता कुठे जायचं, थेट मुंबई!’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

मराठा आरक्षण : पैठणमध्ये टायर जाळून सरकारचा निषेध

सरकारने आता वेळकाढूपणा थांबवून आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. हीच एकमुखी मागणी आंदोलकांनी लावून धरली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट महामार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध नोंदवला.

दुसरीकडे, या प्रचंड वाहतूक कोंडीत एक स्कूल बस अडकली होती. एरवी अशा वेळी चिडचिड होते, पण इथे चित्र वेगळेच होते. बसमधील विद्यार्थ्यांनी जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला. “आज शाळेला उशीर झाला तरी चालेल. पण आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षणाची गरज आहे,” अशी थेट भूमिका या चिमुकल्यांनी मांडली. या अनपेक्षित पाठिंब्याने उपस्थितांचेही लक्ष वेधून घेतले.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पैठण पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्रीमती पाईकराव, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे आणि त्यांच्या पथकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

शेवटी, राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता झाली. विशेष म्हणजे, शाळकरी विद्यार्थ्यांच्याच हस्ते पोलीस आणि तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या रास्ता रोकोमध्ये किशोर पाटील शिरवत, मनोज पाटील मुरदारे, किरण काळे पाटील, पवन शिसोदे, रमेश गवारे यांच्यासह हजारो नागरिक आणि समन्वयक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही