Share

‘माणसं बेशुद्ध पडल्यानंतर मसुदा वाचला का विचारणार?’; जरांगे यांचा सरकारला सवाल

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. प्रमाणपत्र वाटपावरून त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.

Published On: 

Manoj Jarange Maratha Reservation protest

Manoj jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) सध्या उपोषणाला बसले आहे. आज या आंदोलनाचा (Protest) पाचवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांत त्यांची प्रकृती खालावत असल्याचे वृत्त आहे.

अशा परिस्थितीत, काल सरकारी शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांना सांगितले. मात्र, मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नसल्याने जरांगे यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.

“58 लाख नोंदींच्या आधारे आजपासूनच जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करा. तसेच सातारा आणि कोल्हापूर संस्थानचे जीआर काढावेत आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करावे,” अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

Manoj Jarange Maratha Reservation protest

“सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम सुरू आहे. आम्ही सांगितलं आहे की संपूर्ण मसुद्याची अंमलबजावणी करा, रद्द केलेली चार प्रमाणपत्रं वैध करून द्यावीत, ईबीसीसीमधून नियुक्त्या झालेल्या मुलांना नियुक्त्या द्याव्यात, तसेच सारथी आणि महामंडळाचे परतावे द्यावेत.” अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.

“सरकारच्या शिष्टमंडळाकडून मसुदा वाचला का आणि तो मान्य आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे म्हणाले की, “मी मसुदा वाचला नाही. तुम्ही माणसाची तब्येत खराब होण्याची वाट पाहा. माणसं बेशुद्ध पडल्यानंतर येणार आणि मसुदा वाचला का असं विचारणार? मराठे चवताळले तर तुम्हाला हाताखालून काढतील. मुंबईतही हेच होईल,” असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे यांनी आरोप केला की, सरकार मराठा समाजासोबतच ओबीसी समाजाचीही फसवणूक करत आहे. आपण सगळ्या जाती मिळून यांना कुटून काढू, आंदोलनादरम्यान कोणालाही हात न लावण्याचं आवाहनही त्यांनी केले. दंगल घडवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण उपोषण सोडून देऊ, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. .

सरकारने आधी चार प्रमाणपत्रांविषयीची मागणी पूर्ण करावी, असा आग्रह जरांगे यांनी धरला. तसेच, कोल्हापूर आणि सातारा संस्थानांशी संबंधित मसुदा कागदपत्रे अद्याप उपलब्ध करून दिली नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘तुम्ही चुकीचे जीआर आणा. काही चुकलं तर सुधारित जीआर काढा. तुम्ही कॅम्प लावला तर काढा ना मग! गावागावात प्रमाणपत्र वाटप सुरू करा,’ अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.

यावेळी मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करत म्हणाले की, “त्यांच्या राजकारणाशी आपल्याला काहीही घेणं-देणं नाही.” चांगला रिस्पॉन्स म्हणजे काय? त्यांना गोळ्या सुरू आहेत का? ते मराठ्यांचा अवमान करायला लागले. तुम्हाला यायचं असेल तर सगळे जीआर काढून या; अन्यथा येऊ नका,’ असे खडेबोल जरांगे यांनी सुनावले.

विखे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, “तुम्ही आमच्या नोंदी कमी केल्या. लोकांचं धुणं धुवू नका. आता तू शिफारस कर; कुणाकडे बोटं दाखवू नको,”
“मी पण आता मुंबईला जायला सज्ज होतो. उपोषण मी सोडणार नाही,’ असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही