Share

Devendra Fadnavis | “आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली म्हणून…”; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

Devendra Fadnavis | नाशिक: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली होती. भाजप महाराष्ट्र द्वेशी आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. Aditya Thackeray is … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | नाशिक: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली होती. भाजप महाराष्ट्र द्वेशी आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Aditya Thackeray is blindfolded – Devendra Fadnavis

आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आदित्य ठाकरे अभ्यास करून बोलतील किंवा भाषण करतील असं आम्हाला वाटलं होतं.

मात्र, तसं काही झालं नाही. आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. त्यामुळं डोळ्याला पट्टी बांधलेल्या लोकांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही. त्यांना फक्त विरोधाला विरोध करायचा आहे.”

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भाजप सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “नाणार असो की बारसू असो…

भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी?

“पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहताएत?

उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील… स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील! कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही