Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा काल मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रामध्ये औरंगजेब जिवंत आहे की नाही? राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही? औरंगी वृत्ती फडणवीस (Devendra Fadnavis) साहेबांच्या पक्षात आहे.
त्यांच्यात औरंगजेब दडला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरे हा एक नमक हराम माणूस आहे. जो स्वतःच्या वडील, धर्म आणि भावाचा झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सख्ख्या भावापेक्षा जास्त उद्धव ठाकरेंचे लाड केले आहे.
2014 ते 2019 या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सगळे लाड पुरवले. त्या देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे जर नावं ठेवत असेल, तर त्यांच्यापेक्षा नमक हराम कोणी असू शकत नाही.
पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं मूळ दुखणं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष नाही. रवींद्र वायकर आणि किशोरी पेडणेकर यांच्या कारवाया सुरू आहे.
एक बाप म्हणून उद्धव ठाकरे यांना आता कळून चुकलं की माझी मुलं आता जेलमध्ये जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची चिंता वाढलेली असून त्यांना त्याचा राग आला आहे. म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा राग काढत आहे.
Are Ajit Pawar and Eknath Shinde children?
“उद्धव ठाकरे दुसऱ्यांना मस्टर मंत्री म्हणून त्यांची पात्रता महाराष्ट्राला दाखवत आहे. ते म्हणतात देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडला. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लहान मुलं आहेत का?
त्यांना त्यांचं बरं वाईट कळतं म्हणून ते आमच्यासोबत आले. त्यांना महाविकास आघाडीमध्ये त्यांचं भविष्य दिसतं नव्हतं, म्हणून ते महायुतीत सामील झाले आहे. ते आमच्या दरवाज्यात आले होते, देवेंद्रजी त्यांच्याकडे गेले नव्हते”, असही ते (Nitesh Rane) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड अजित पवार गटात जाणार? आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
- Chandrashekhar Bawankule | “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
- Kishori Pednekar | ठाकरे गटाला मोठा धक्का! कोविड घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
- Devendra Fadnavis | “कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे आज…”; देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका
- Sharad Pawar | भाजपला मोठा धक्का! कोल्हापुरातील बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश