Kishori Pednekar | ठाकरे गटाला मोठा धक्का! कोविड घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

Kishori Pednekar | मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळा प्रकरणावरून ठाकरे गट पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर या  प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किशोरी पेडणेकर  यांच्यावर करण्यात आला आहे.

A case has been registered against Kishori Pednekar

कोविड काळामध्ये टेंडर प्रक्रियेत झालेल्या या घोटाळ्यामध्ये किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) सहभागी होत्या, असं ईडीनं म्हटलं होतं. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

अशात आर्थिक गुन्हे शाखेनं किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना कालावधीमध्ये मृतदेहांच्या बॅगची किंमत जास्त दाखवून गैरव्यवहार करत फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकरणावरून ईडीनं ठाकरे गटाला घेरलं होतं.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं छापेमारी केली होती. ईडीच्या पाच अधिकाऱ्यांनी चव्हाण यांची चौकशी केली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.