Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुंबईतील निवासस्थानी विषारी साप आढळून आला होता.
सर्प मित्राला बोलवून सापाला रेस्क्यू करून जंगलात सोडण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी निघालेला साप साधारण चार फूट लांब होता.
या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. तर घटनेवरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
ट्विट करत शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) म्हणाल्या, “ज्या ठिकाणी आधी वाघाची डरकाळी ऐकू येत होती.. तिथेच आता विषारी नागाची फुसफुस ऐकू येऊ लागलेली आहे.. कालाय तस्मै नम:!!” शितल म्हात्रे यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ज्या ठिकाणी आधी वाघाची डरकाळी ऐकू येत होती.. तिथेच आता विषारी नागाची फुसफुस ऐकू येऊ लागलेली आहे.. कालाय तस्मै नम:!! pic.twitter.com/qu6JJLUkLT
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) August 7, 2023
We feel sorry for Devendra Fadnavis now – Uddhav Thackeray
दरम्यान, काल ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची आता आम्हाला दया येते. अजून किती दिवस ते दुसऱ्यांची ओझी वाहणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर देखील खोचक टीका केली आहे.
‘शिवसेना फोडणारा औरंग्या’ असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांना म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि ठाकरे गटामध्ये नाव वाद सुरू झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना भाजपची चिंता करायची गरज नाही.
त्यांनी आता फक्त स्वतःची काळजी करावी. कारण त्यांचा पक्ष, नेतृत्व, परिवार, चिन्ह सगळं संपलं आहे. इतकंच काय तर त्यांना त्यांचे मंत्री आणि आमदार देखील सोडून गेले आहे. त्यामुळे त्यांनी आता दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचा चोंबडेपणा बंद करावा.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | “सोनियाचा दिवस कधी येणार याची वाट…”; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका
- Ambadas Danve | “आमचा नेता आजही बलशाली…”; बावनकुळेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
- Ashish Shelar | उद्धव ठाकरेंची ओळख म्हणजे घरबशा मुख्यमंत्री – आशिष शेलार
- Vijay Wadettiwar | “हुकूमशाही सरकारविरोधी सुरू असलेल्या लढ्यातील…”; राहुल गांधींना खासदारकी मिळाल्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ! भिडेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल