Share

Best Bus Strike | अखेर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे

🕒 1 min read Best Bus Strike | मुंबई: कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या आठवड्यापासून त्यांचं हे आंदोलन सुरू होतं. सुरुवातीला या आंदोलनात फक्त तीन ते चार बस डेपोमधील कंत्राटी कर्मचारी सामील झाले होते. त्यानंतर या आंदोलनाला बहुतांश बस डेपोमधील कंत्राटी वाहक आणि चालकांनी पाठिंबा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Best Bus Strike | मुंबई: कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या आठवड्यापासून त्यांचं हे आंदोलन सुरू होतं.

सुरुवातीला या आंदोलनात फक्त तीन ते चार बस डेपोमधील कंत्राटी कर्मचारी सामील झाले होते. त्यानंतर या आंदोलनाला बहुतांश बस डेपोमधील कंत्राटी वाहक आणि चालकांनी पाठिंबा दर्शवला होता.

A meeting was held between Best Contract and Eknath Shinde

यासंदर्भात बेस्ट कंत्राटी (Best Bus Strike) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात बैठक पार पडली. यानंतर कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य होतच त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आजपासूनच ते हा संप मागे घेत असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आझाद मैदानावर बेस्टच्या कंत्राटी (Best Bus Strike) कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

त्यांच्या या उपोषणाला घाटकोपर बस डेपोतील जवळपास 280 कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दर्शवला होता. सरकार आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानुसार त्यांच्या मागण्या पूर्ण होताचं त्यांनी त्यांचा संप मागे घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही